अयोध्यातील राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील लाखो लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण राम मंदिराच्या उभारणीसाठी पाचशे वर्षाचा वेळ लागण ही शरमेची बाब आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेनी (Milind Parande) व्यक्त केले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज भाजपाला फायदा मिळण्याचा विषय नसता, असेही मिलिंद परांडे म्हणाले.
राम हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या मंदिरासाठी सर्व पक्षांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता तर आज एकाच पक्षाला भाजपाला त्याचा फायदा मिळण्याचा विषय नव्हता. मुळात ८० टक्केपेक्षा जास्त हिंदू असलेल्या देशात राम मंदिराच्या स्थापनेसाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणे ही शरमेची बाब आहे, हे आधीच व्हायला हवे, असे परांडे म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा फायदा भाजपला होईल का? असा प्रश्न मिलिंद परांडे यांनी विचारला आहे. राम जन्मभूमीवर मंदिर हे हिंदूंचे स्वाभिमान होते, म्हणूनच मीर बाकीने राम जन्मभूमीचे मंदिर तोडले होते. त्यांना हिंदू समाजाचा अपमान करायचा होता. त्यामुळेच आज राम मंदिराचा निर्माण हिंदू स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि राष्ट्रीय आदर्शाचा विषय झाला आहे. देशभरात रामाची अनेक मंदिर आहेत मात्र राम जन्मभूमीमध्ये एकच मंदिर तयार होणार असून त्याचे थाटात लोकार्पण होऊन हिंदूंची स्वप्नपूर्ती होणार आहे, असे मिलिंद परांडे म्हणाले.
हिंदूंनी राम मंदिरात दान केलेले धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही त्यांच्यासाठी हिंदू मंदिरात दान करण्यात आलेले धन का खर्च करण्यात यावे, असा प्रश्न हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) विचारला आहे. हिंदू मंदिरे आणि धार्मिक स्थळ सरकारपासून मुक्त करून ती हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवले पाहिजे, अशी मागणी मिलिंद परांडे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत