Friday, April 19, 2024

Latest Posts

उबाठा गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांचा CM Shinde यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उबाठा गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राध्यापक बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होत्या. मात्र उबाठा गटात वारंवार अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी त्यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना प्रा. बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss