Saturday, July 27, 2024

Latest Posts

येत्या नवीनवर्षात मुंबईत कोणत्या नवीन प्रकल्पांचं होणार उद्घाटन

मुंबई ची लाईफ लाइन असणाऱ्या मुंबई लोकलची नवीन वर्षातील मुंबईकरांना एक नवीन भेट देण्यात येणार आहे. काय असणार आहे

मुंबई ची लाईफ लाइन असणाऱ्या मुंबई लोकलची नवीन वर्षातील मुंबईकरांना एक नवीन भेट देण्यात येणार आहे. काय असणार आहे. हे नवीन गिफ्ट याची सर्वानाच उसुक्तता लागली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी नव्या वर्षात नवनवीन प्रकल्पांच्या उद्घाटनांचा पाऊस पाडला जाणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्प लोकर्पित केले जातील. ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबईसाठी प्रकल्प हाती न घेता या मुळे मुंबईकरांचा प्रवास जास्तीत जास्त सुखाचा होणार आहे. असलेल्या शहरांचा देखील एकत्रित विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र-राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भागिदारी या विकासकामांमध्ये आहे.

कोणते असणार आहेत हे महत्वाचे मार्ग पाहुयात

>अक्वा लाईन म्हणजेच मेट्रो ३ पहिला टप्पा (Mumbai Metro 3 Aqua Line)
> मुंबई कोस्टल रोड पहिला टप्पा (Mumbai Coastal Road)
> मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link )
> नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro)
> बेलापूर-नेरूळ ते उरण रेल्वे मार्गिका (Belapur CBD to Nerul To Uran Railway)
> दिघा स्टेशन (Digha Station)
> मोठागाव माणकोली पूल

 


गेल्या काही वर्षात अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले. आता या प्रकल्पांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर काही प्रकल्पांचे काम पूर्णतः संपले आहे. त्यामुळेच येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे सर्व प्रकल्प पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. तर असेही अनेक प्रकल्प आहेत, ज्यांचे भूमिपूजन पंतप्रधान करतील. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि जवळपासच्या शहरात प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धडाका लागणार आहे.

हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास आले असल्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकल्पाच्या लोकार्पणावरून सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील हल्लीच एक ट्विट करून या प्रकल्पांची आठवण सरकारला करून दिली आहे. काही प्रकल्प तयार असूनही उद्घाटना अभावी रखडवण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

हे ही वाचा:

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss