Saturday, July 27, 2024

Latest Posts

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

नुकत्याच राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे पार पडले आहे. दिनांक ७ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनात सर्व नेत्यांनी त्यांची हजेरी ही लावली होती.

नुकत्याच राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे पार पडले आहे. दिनांक ७ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनात सर्व नेत्यांनी त्यांची हजेरी ही लावली होती. नुकतंच काल हे अधिवेशन हे संपले आहे. आणि आता अनेकांच्या नजरा या राज्याच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच एक वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुका भाजप एकट्याने लढवणार असून, ज्यांना भाजपसोबत निवडणुका लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवण्याचे भाजप आणि आरआरएसच्या बैठकीत ठरले असल्याचा दावा केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रतिउत्तर देत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एक मोठा दावा हा केला आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण हे आले आहे. यावेळी संजय शिरसाट म्हणाले आहेत की, शिंदे गटाचे नेते कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही.

तसेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज्याच्या आगामी निवडणुकांसंदर्भात मोठा दावा केला आहे. आगामी निवडणुका (Elections) आम्ही भाजपसोबत (BJP) युतीत लढणार आहेत आणि त्या धनुष्यबाणावरच लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट संवाद भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झाला आहे असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी इतके ठाम पणे गोष्टी सांगितल्यामुळे आता राज्यात अनेक चर्चाना उधाण हे आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिकत करत असताना शिरसाट म्हणाले आहेत की, “राजकारणात भविष्य पाहणारे लोकांची संख्या जास्त झाली आहे. तुम्ही अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला शिकवू नयेत. तुम्हाला आता आतल्या मीटिंगमध्ये मुद्दे देखील कळत असेल तर तुमचं कठीण आहे. तुम्ही कुठेही कान लावू नका, तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा,” असा खोचक टोलाही शिरसाट यांनी आव्हाडांना लगावला.

 

दीड वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप हा झाला. राज्यात शिवसेना या पक्षाचे दोन गट पडले. या वादामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची स्थापना झाली तर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट तयार झाला. या विभागणीमुळे आमदार खासदार यांच्या सह शिवसैनिकांची देखील फाटाफुट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अखेर आता या प्रकणात नुकतीचे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. आता प्रतीक्षा असणार आहे ती विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss