Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Nana Patole यांच्या कारचा भीषण अपघात, Congress नेत्याकडून BJP वर गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीला भीषण अपघात झाला (Nana Patole Car Accident) असून यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. उभ्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातावरून काँग्रेसने (Congress) भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत, “विरोधी पक्षाला संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अतुल लोंढे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत बोलताना सांगितले, “विरोधी पक्षाला संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.”

भंडारा शहराजवळच्या भिलवाडा गावाजवळ हि घटना घडली आहे. मंगळवारी, (९ एप्रिल) नाना पटोले निवडणूक प्रचाराचा सुनिश्चित कार्यक्रम आटपून सुकळी या गावी जात होते. त्यावेळी मध्यरात्री हि दुर्घटना घडली. उभ्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने यात नाना पटोले यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे. परंतु राजकीय वर्तुळात या अपघातावरून अनेक तर्क – वितर्क लावण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss