Thursday, May 16, 2024

Latest Posts

“यांच” बिनशर्त असतं आणि “त्यांच” मुख्यमंत्री पद मागतं, काय म्हणाले ASHISH SHELAR?

गुढीपाडव्यानिमित्त मंगळवार दिनांक ९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत अकाउंटवरून याबद्दलची माहिती देण्यात आली होती. ९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे! असे ट्विट करत मनसेच्या मेळाव्याबद्दल टिझर शेयर करण्यात आला होता. त्यानंतर ९ एप्रिलला शिवतीर्थ येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याला संबोधित केले.

आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा. असे राज ठाकरे मेळाव्यात म्हणाले. यावर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्वीट केले आहे. 

काय म्हणाले आशिष शेलार? 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं “यांच” आणि “त्यांच” सेम नसतं ! काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, “यांच” बिनशर्त असतं आणि “त्यांच” मुख्यमंत्री पद मागतं ! त्यासाठी देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत ! प्रेम.. “यांच” आणि “त्यांच” सेम नसतं ! (कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून)

काय म्हणाले राज ठाकरे? 

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात. मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, “राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.”माझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे.

हे ही वाचा:

SHIVSENA कोण वाचवते हे येणारा काळ ठरवेल -VIJAY WADETTIWAR

अखेर MAHAVIKAS AGHADI चा प्रश्न मार्गी लागणार, कधी मिळणार उत्तर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss