Monday, May 20, 2024

Latest Posts

लोकशाही संपवण्यासाठी ‘ते’ खालच्या पातळीवर गेलेत, Nana Patole यांची आक्रमक भूमिका

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नागपूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. भाजप लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस भाजप सरकारने काँग्रेसचे खाते गोठवणं, पर्यायाने लोकशाही संपवणं हा त्यांचा हेतू आहे. भाजपने इन्कम टॅक्सचा हिशोब दिला का हे सांगावे, गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपाने पैसे घेतले आहेत. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस उमेदवाराचा IFSC कोड जाहीर करणार आहोत. काँग्रेसच्या उमेदवाराला जे काही आर्थिक मदत असेल ती देण्यात यावी असे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आवाहन करत असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

परिवारवाद शब्द वापरून भाजप भ्रम निर्माण करत आहे. अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट बोर्डवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. पंकजा मुंडेंचे व वडील राजकरणात होते. याला परिवारवाद म्हणायचे नाही का? असा सवाल यावेळी नाना पटोले यांनी केला. तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता तुमच्याकडे चार बोटं आहेत हे भाजपाच्या शीर्ष नेत्यांनी देखील ओळखलं पाहिजे. अकोल्यात दंगल भडकवणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली, असं सांगितलं जात होतं, मात्र त्यात दुसरचं कोणी होतं. भाजपाची लोकं घाबरुन त्यांना आता दंगलखोर घोषित करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये तालिब शहाला भाजपचा नेता बनवला आहे. लष्कर-ए-तोयबाच्या लोकांना भाजपमध्ये घेत आहे.आतंकवादी लोकांची पार्टी झालीय का भाजपा? असा आक्रमक सवाल विचारत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांना, तरुणांना, कामगारांना आणि महिलांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं का? जनतेचे प्रश्न काँग्रेस मांडणार आहे त्याचे भाजपने उत्तर द्यावे. भारताला विकून देश चालवणारी लोक देशात बसले आहे. देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं. प्रत्येकाने ५० ते १०० रुपये देऊन मदत करा, असे आवाहन माध्यमांशी बोलतांना नाना पटोले यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेसोबत युती का तुटली ते माहीत नाही. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी पटोले यांनी सांगितले.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या निर्णयावर संजय राऊतांनी दिली प्रतिकिया

मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर येणार नियंत्रण, पण कसे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss