बैलगाडा शर्यतीवर लवकरच येणार नवा चित्रपट, अमोल कोल्हे

राज्यामधील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतीच्या परवानगीच्या शर्यतीमध्ये आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केला आहे.

बैलगाडा शर्यतीवर लवकरच येणार नवा चित्रपट, अमोल कोल्हे

राज्यामधील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतीच्या परवानगीच्या शर्यतीमध्ये आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार आहेत असे अमोल कोल्हे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता बैलगाडा थरार, मेहनत आणि त्यासाठी संपूर्ण लागणारी तयारी महाराष्ट्रामधील घराघरात पोहोचणार आहे. बैलगाडा शर्यतीवर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीवर सिनेमा काढण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हा दिमाखदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे असे अमोल कोल्हे म्हणाले.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका १५७ देशांमध्ये पोहोचली त्यावेळी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरो पोहोचला. त्यांनतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षकांना इतिहास अनुभवता आला. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या माहितीचा श्वास आहे. बैलगाडा शर्यत याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी लोक परदेशातून येतात आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल अशा पद्धतीने हा सिनेमा तयार केला जाणार आहे. राज्यामधील बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने बंदी हटवली आहे ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सगळ्या बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी हा दिवाळी, दसऱ्यासारखा दिवस आहे.प्रेतेक बैलगाडा मालकांचं, शौकिनांचं आणि प्रेमींचं हे मोठं यश आहे असे अमोल कोल्हे म्हणाले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version