Friday, May 17, 2024

Latest Posts

NATIONAL VOTERS DAY निमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव

जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २४ व २५ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केले, मतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम केले आहे. ही प्रक्रिया अविरत सुरू असून, नव मतदारांनी नाव नोंदणी करावी. राज्यातील सर्व युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग- स्वीप उपक्रम राबवून मतदार यादी दुरूस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि स्वीप नोडल अधिकारी , मतदार नोंदणी अधिकारी यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर विभागात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, अमरावती विभागात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे, मतदार नोंदणी अधिकारी वैशाली देवकर, पुणे विभागात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप नोडल अधिकारी डॉ. अर्चना तांबे, नाशिक विभागात जिल्हाधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, स्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदे, नांदेड विभागात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण, मतदार नोंदणी अधिकारी शरद मंडलिक, कोकण विभागाचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, मतदार नोंदणी अधिकारी जीवन देसाई यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट उप जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर विभाग, उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार पुणे विभाग तसेच  उत्कृष्ट माहिती व तंत्रज्ञान समन्वयक पुरस्कार राज्य माहिती व तंत्रज्ञान समन्वयक कैलास हिरे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार रत्नागिरी जिल्हा जिल्हाधिकारी वैभव आंबेरकर, ठाणे जिल्हाधिकारी अजिंक्य दिवेकर, पुणे जिल्हामनोज पुराणिक, ठाणे जिल्हा विलास पाटील यांना समाजमाध्यम समन्वयक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना प्रदान करण्यात आला.  टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार निशा नांबियार यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिव्यक्ती मताच्या स्पर्धेत उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी धनश्री भागडकर यांना प्रथम पुरस्कार, उत्कृष्ट घोषवाक्यास साक्षी चक्रदेव यांस प्रथम पुरस्कार, उत्कृष्ट जाहिरातनिर्मिती स्पर्धेत तेजस साळगावकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपनगरचे डॉ. राजेंद्र भोसले, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडिया, निवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटे, चित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारे, लेखिका डॉ. निर्मोही फडके, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, अभिनेता विकास पाटील उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss