Sunday, February 25, 2024

Latest Posts

महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरले, नेपाळमध्ये २०० तर श्रीलंकेत ३०० रुपये किलोवर कांदा

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यानंतर कांद्याचे दर घसरले आहेत. बाजारात दहा दहा दिवसांपूर्वी चार हजारात विकला गेलेला कांदा गेल्या दहा दिवसांत दोन हजाराच्या खाली आला आहे. पण भारताच्या शेजारील देशात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. कांद्याचे बाजार भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याच्या निर्यातवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात २००० रुपयांची घसरण झाली आहे.

येवला बाजार समितीमध्ये कांद्याला पंधराशे रुपये सरासरी भाव जरी करण्यात आला असून बाराशे ते तेराशे रुपये कांद्याची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरण असताना निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे. कांद्याचे दर प्रतिकिलो २०० तर श्रीलंकेमध्ये ३०० रुपये किलोवर गेला आहे. भारतातील कांदा निर्यात बंदीचा फटका इतर देशांना देखील बसला आहे. एकीकडे कांद्याचे दर घसरत असताना बाकीच्या देशात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. गेल्या दहा दिवसात कांद्याचा दर नेपाळमध्ये दुपट झाला आहे. दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रतिकिलो मिळणार कांदा आता दोनशे रुपये किलोंवर पोहचला आहे. नेपाळने मागील आर्थिक वर्षांत ६.७५ अब्ज रुपयांचा १९० टन कांदा आयत केला होता. २०२३ नोव्हेंबरमध्ये सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर किंमत २५० रुपये झाली होती.

भारताच्या कांदा निर्यात बंदीचा परिमाण श्रीलंकेत झाला आहे. कांद्याची किंमत ३०० रुपये प्रती किलोवर जाऊन पोहचली आहे. मालदीवसुद्धा कांद्याबाबत भारतावर अवलंबून आहे. मालदीवमध्ये २०० ते ३५० रूफीया प्रती पॅकेट कांदा विकला जात होतो. तो भारताने कांदा निर्यात बंदी करताच ५०० रूफीया पॅकेटपासून ९०० रूफीया पॅकेटपर्यंत गेला आहे. भूतानमध्ये ५० नगुल्ट्रम प्रती किलो कांदा विकला जात होता. भारताच्या निर्णयानंतर आता हा दर १५० नगुल्ट्रम प्रति किलोवर गेला आहे. बांगला देशात कांदा २०० प्रती किलोटकावर गेला आहे. हा कांदा पूर्वी १३० टका प्रती किलोवर होता.

हे ही वाचा:

‘Karma caliing’ या वेब सिरीजमधून रवीना टंडनचं ओटीटीवर पदार्पण,वेब सिरीजचे टीझर आउट

POLITICS: निवडणूक फक्त भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी, काय म्हणाले DEVENDRA FADNAVIS?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss