Friday, April 19, 2024

Latest Posts

इतके धिंडवडे निघालेला आपला महाराष्ट्र कधी नव्हता – VIJAY WADETTIWAR

या राज्यात सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? त्यावेळी म्हणायचे कुठे नेला महाराष्ट्र माझा? आता कुठे खड्ड्यात घातलाय महाराष्ट्र माझा? अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. असे मत उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (VIJAY WADETTIWAR) यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पोलिसांच्या केबिनमध्ये जाऊन तो गोळीबार करणारा सरावलेला गुंड आहे. सत्तेच्या भरवश्यावर यांची दादागिरी वाढलेली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वॉर सुरू आहे. निवडणुकाजवळ येतील तसे-तसे मारामारी, गोळीबार होऊन हे सगळं बघायला मिळेल. हा भूमाफियाचा विषय आहे. भ्रष्टाचार करून जमिनी हडपून अनेक उदाहरणे देता येईल. अशा पद्धतीने पैसे कमवण्याचं काम सध्या सरकारमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना होणे, पुढच्या काळात काय होईल? याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने बघावे. सगळीकडे गुंड पोसून महाराष्ट्रातील राजकारण सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  (VIJAY WADETTIWAR) यांनी ट्विटरद्वारे सुद्धा उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? असा सवाल त्यांनी विचारला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड (MAHESH GAIKWAD) यांच्यात उल्हासनगर (ULHASNAGAR) इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (SHINDE GROUP) आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता! असे विजय वडेट्टीवार ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

महेश गायकवाड यांच्या संदर्भात डॉक्टरांनी दिले महत्वाचे अपडेट…

पोलिस अधिकाऱ्यासमोर भाजप आमदाराच्या शिंदे गटाच्या नेत्यावर केला गोळीबार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss