Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: स्वतःच्या फायद्यासाठी अदानीचा वापर करता आणि आता त्यांनाच विरोध करता?

उद्धव ठाकरे यांच्या कुर्त्याला खिशा तर नाहीच आहे. यांनी मुंबई (MUMBAI), बी.एम.सी (BMC) लुटली आणि आता यांच्या मनात काय आहे?

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा १६ डिसेंबरला काढण्यात आला होता.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या मोर्च्याच्या अनुषंगाने धारावीत बॅनरबाजी करण्यात आली होती. यावेळी धारावी ते बीकेसी (BKC) पर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४५ ते ५ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी ३०० च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (VARSHA GAIKWAD), सदा परब (SADA PARAB), आमदार आदित्य ठाकरे (AADITYA THACKERAY), पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY), खासदार संजय राऊत (SANJAY RAUT) तसेच ठाकरे गटाचे इतर कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या मोर्च्याला घेऊन आता राजकीत वातावरणात चांगलीच चर्चा रंगून आल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या विरोधात असलेले अनेकजण आता मोर्च्यावर तसेच उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसाठी घेतलेल्या बाजूवर आता विरोधक टीका करतांना दिसून येत आहेत. याबाबत भाजपा प्रवक्ते मोहित कंबोज यांनी काही सवाल विचारले आहेत.

काय म्हणाले मोहित कंबोज? 

आज एक गिरगीटने आत्महत्या केली. त्याचे सुसाइड नोट मिळाले त्यामध्ये असं लिहिले होते की, रंग बदलून सुद्धा मी आता मनुष्याचा मुकाबला नाही करू शकत म्हणून आत्महत्या केली, याचे उदाहरण म्हणजेच उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY). जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा धारावीच्या विकासासाठी सर्व टेंडर पास करत होते, आता अचानक या सर्वापासून पाठ फिरवत आहेत आणि धारावी विकासाला (DHARAVI DEVELOPMENT) विरोध करत मोर्चा काढत आहेत. उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की हे सर्व दुप्पटी भूमिका घेण्यामागे नेमकं कारण काय?? कालपर्यंत गौतम अदाणी (GAUTAM ADANI) तुमचे प्रिय मित्र होते. एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. तुमचं मग आता एवढे कसे विरोधक झाले? उद्धव ठाकरे यांनी अडाणी सोबत कुठल नातं आहे ते सर्व जनतेला सांगावं, अनेकवेळा जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बाहेरगावी जाण्यासाठी फ्लाईटची गरज असते तेव्हा तुम्ही अदाणीच्या पर्सनल फ्लाईटने बाहेर जाता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (AADITYA THACKERAY), संजय राऊत (SANJAY RAUT), मिलिंद नार्वेकर (MILIND NARVEKAR), रामनाथ पंडित (RAMNATH PANDIT), अजय मेहता (AJAY MEHATA), रावराणे आणि राजपूत हे सर्व अडाणी यांच्या पर्सनल फ्लाईटने दिल्लीला (DELHI) गेले होते. त्या फ्लाईटच्या तिकीटचे पैसे त्यांना अजून दिले आहेत का तुम्ही? स्वतःच्या फायद्यासाठी गौतम अदाणी यांचा वापर करून घेता आणि आता विकासाच्या वेळी त्यांनाच विरोध करत आहेत? धारावीमध्ये पण आता मातोश्री ३ बांधायचं आहे का? म्हणून धारावी विकासाला विरोध करत आहेत? उद्धव ठाकरे यांच्या कुर्त्याला खिशा तर नाहीच आहे. यांनी मुंबई (MUMBAI), बी.एम.सी (BMC) लुटली आणि आता यांच्या मनात काय आहे? विकासासाठी हे त्यांनी सर्व जनतेला सांगावं असे भाजपा प्रवक्ते मोहित कंबोज (BJP MOHIT KAMBOJ) म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss