spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर….

भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA GANPAT GAIKWAD) यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर उल्हासनगर येथे गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली असून आता त्यांना उल्हासनगर येथील चोपडा कोर्ट येथे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. याच प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश यांनी महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले, तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेने घरी बसवले पाहिजे, तेव्हाच लोकशाही टिकेल. राज्यातील पूर्ण प्रशासन कोसळले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे बघितले पाहिजे. राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री महोदयांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलिसांच्या श्रीमुखात भडकावितात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. ही या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे. यांचा खेळ होतो पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मात्र हाल होतात. भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीचं वाढणार’ असा थेट आरोप करतात. हा आरोप अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे. शांतताप्रिय सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी गुंडगिरी खपवून घेता कामा नये. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

महेश गायकवाड यांच्या संदर्भात डॉक्टरांनी दिले महत्वाचे अपडेट…

मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss