Monday, April 22, 2024

Latest Posts

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती

आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (Bharat Ratna to LK Advani) जाहीर करण्यात आला आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भाची बातमी ही दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर आता आडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट मध्ये नेमकं काय म्हणाले –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न पुरस्कारची घोषणा करताना म्हटले आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे. लालकृष्ण आडवाणीजी यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.

(I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a life that started from working at the grassroots to serving the nation as our Deputy Prime Minister. He distinguished himself as our Home Minister and I&B Minister as well. His Parliamentary interventions have always been exemplary, full of rich insights.)

दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये सख्य नसल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर अडवाणींना पुरस्कार जाहीर करून नरेंद्र मोदी हे अडवाणींना विसरले नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss