पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील विमान नगर येथे गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणवर आग लागली आहे. एकाच वेळी १० गॅस सिलेंडर फुटल्यामुळे हा स्फोट झाला आहे. लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. विमान नगर येथे एका बेकायदेशीर इमारतीमध्ये सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. या इमारतीमध्ये तब्बल १०० पेक्षा जास्त सिलेंडर ठेवण्यात आले होते. या १०० सिलेंडरांमधील १० सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सुदैवाने लागलेल्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे. बांधकामाच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
नागपूरच्या भूमितून परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा, नाना पटोले