Saturday, July 27, 2024

Latest Posts

सरकारने मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे २२ जानेवारी २०२४ ला मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईमधील आझाद मैदानात ते उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव मुंबईमध्ये येणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच रुग्णालयात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सरकारने आम्हाला मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आता थांबणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आम्हला मुंबईला जाण्याची हौस नाही. आमच्या मुलांचे पुढील काळात वाटोळे होणार आहे, त्यामुळे त्यांना आम्हला आरक्षण द्याच आहे. हीच आमच्या गोर गरीब मराठयांची भूमिका असून आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आता शेवटचं सांगतो मुग्यांसारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहेत. सरकारने मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही. ज्याज्या वेळी मी बोलतो त्यात्यावेळी मी ते करतो. आता मुंबईमध्ये आल्यानंतर माघार घेणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी जीव देखील घेण्याची तयारी आहे. पण आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. आमच्यावर खोटे आरोप दाखल करू नका. मराठा समाजाची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका असे मी देवेंद्र फडणवीस यांना मी पाच वेळा सांगितले आहे. तुम्ही आमचे ट्रॅक्टर अडवू नका, तसेच अडवले तरीही आम्ही मुंबईत येणारच आहे. आंतरवाली सराटी सारखे प्रयोग आता पुन्हा करू नका. कोट्यावधी मराठे एकत्र आले आहेत. वाटेला जाल तर तुम्हाला जड जाईल. तसेच आम्ही पोलिसांकडे अर्ज करूनच मुंबईच्या दिशेने येणार आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले.

मंत्री संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. रुग्णालयात गेल्यानंतर संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी आरक्षणावर देखील चर्चा केली. तर यावेळी जरांगे यांनी काही मागण्या भुमरे यांच्याजवळ मांडल्या. निष्पाप मराठ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, आंदोलन काळात अपघातात मयत झालेल्या मराठ्यांना मदत करण्यात यावी , अश्या काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

हे ही वाचा:

थंडीत चेहऱ्यावर काळवटलेला दिसून येतोय, तर घरच्या घरी  करा ‘हे’ उपाय

नागपूरच्या भूमितून परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss