Friday, March 1, 2024

Latest Posts

पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका फटाक्यांच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली होती.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका फटाक्यांच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली होती. या आगीमध्ये ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कारखाना चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी शरद सुतार, शरद सुतार, जन्नत नजीर शिकलगार आणि नजीर अमीर शिकलगार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी नजीर अमीर शिकलगार याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

तळवडे येथे शुक्रवारी तीनच्या सुमारास स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरु आहेत. विनापरवाना कारखाना त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षतेबाबत केलेली तडजोड, स्पार्कल कॅण्डल बनवण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक, ज्वालाग्राही पदार्थ हा बेकायदा वापरला जात होता, या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या अनेक कारखाने चालवले जात आहेत. फटका गोदामात लगलेल्या भीषण आगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अवैधरित्या चालणाऱ्या गोदामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध कंपन्या किंवा गोदामावर पिंपरी-चिंचवड महापालिका काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. अशा घटना घडल्यानंतर यंत्रणांकडून तात्पुरते पद्धतीने कारवाई केली जाते. पण पुढे या गोष्टीचा विसर पडतो.

जखमींची नावे
उषा पाडवी (वय- ४०)
कविता राठोड (वय-३५)
रेणुका तातोड (वय-२०)
कमल चोरे (वय-३५)
शरद सुतार (वय-५०)
प्रियंका यादव (वय-३२)
सुमन राधा (वय-४०)
अपेक्षा तोरणे (वय-१८)

हे ही वाचा:

हिवाळ्यात दुध पिताय,तर ‘ही’ गोष्ट मिसळून प्या चेहऱ्यावर येईल तजेलदारपणा

एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरातील ४४ ठिकाणी एनआयएची धाड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss