आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. त्यामुळे हा महामार्ग दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे. यावेळेत वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
महामार्गावरील कामामुळे संपूर्ण वाहतूक पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहेत. तसेच जुन्या पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने सांगितले आहे. याआधी सुद्धा या महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. वारंवार ब्लॉक घेऊनसुद्धा या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र, हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. दोन तासांचा ब्लॉक घेऊन अर्ध काम पूर्ण झाले आहे.
इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे होणारे फायदे:-
वाहने टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणे गरजेचे आहे.
– यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचे असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील.
– ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
– सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
– अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी केली टीका