Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन सुरू, २०४७ पर्यंत भारत विकसित देश

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे.

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. आज सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे.

हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली. येथे राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिक चर्चा झाली. केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. तर आता हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत आहेत. तर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल असं कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलत असताना या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या मतावर आमचा विश्वास आहे. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करतोय, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत. तसेच पुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली, तेव्हा अनेक आव्हानं होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावं आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना जनतेच्या हितासाठी केल्या. सरकारचं लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे. २०२४ पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचं काम केलं आहे. अन्नाच्या समस्या दूर केल्या आहेत. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढलं आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे. तसेच अर्थमंत्री यांनी पुढे उद्दिष्टांचा उल्लेख केला आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मोदी सरकारच्या व्हिजनबद्दल सांगितलं. त्या म्हणाले की, गेली १० वर्ष परिवर्तनाचा काळ आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगानं प्रगती करत आहे, असंही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

रात्री २ वाजता ज्ञानवापी येथील व्यास तळघरात झाली पूजा, ३१ वर्षानंतर गणेश-लक्ष्मीची आरती

Union Budget 2024 : यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष, थोड्याच वेळात सादर होणार अर्थसंकल्प

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss