महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा सुरु आहे. या ठिकाणी अमित ठाकरे यांच्यासह शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत. शिक्षणासाठी परदेशात किंवा परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक कागदपत्रे वेळेवर मिळावी यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा ऑनलाईन कराव्यात, दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, अशा अनेक मागण्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या आवारात मोर्चा पुकारण्यात आला आहे. राजकीय रणधुमाळीत पुण्यात युवानेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन, विद्यार्थी-युवकांसह पुणे विद्यापीठावर धडक दिली.
काय आहेत मागण्या?
- मराठी भाषा भवन झाले पाहिजे.
- वसतीगृहांचा दर्जा सुधारला पाहिजे.
- शिस्तभंग करणाऱ्या व्यक्तींना योग्य शिक्षा झाली पाहिजे.
- महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरी-रोजगाराची कोणतीही शाश्वती हवी.
- विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे.
- रोजगार मेळावे घ्यावेत.
- विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व द्यावे.
- शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवावी.
- नाशिक आणि नगर उपकेंद्रामध्येच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करावे.
- नवीन वसतिगृहे बांधण्याचे काम तत्काळ सुरू करावे.
अमित ठाकरे हे पुणे शहरात संघटनेची बांधणी करत आहेत
शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे अशी आई आणि मुलाची जोडी मोर्चात सहभागी झाल्यामुळे पुणे विद्यापीठावरील मोर्चा चर्चेचा विषय ठरला. चतुर्श्रुंगी मंदिर ते पुणे विद्यापीठ या मार्गावरून सदर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेला हा मोर्चा विद्यापीठाच्या गेटवर अडवण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून अमित ठाकरे हे पुणे शहरात संघटनेचे बांधणी करत आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चा दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडळाच्या अधिपत्याखाली निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अमित ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर उपस्थित होते.
हे ही वाचा:
‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं आणि उर भरून आला,’Best Maa’ पुरस्कार मिळताच हेमांगीची भावूक पोस्ट
ज्येष्ठ अभिनेते Ashok Saraf यांना CM Eknath Shine यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार
Follow Us