Wednesday, May 15, 2024

Latest Posts

‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं आणि उर भरून आला,’Best Maa’ पुरस्कार मिळताच हेमांगीची भावूक पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपलं वर्चस्व गाजवलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपलं वर्चस्व गाजवलं आहे.कायम आपल्या रोखठोक मत व्यक्त करण्यामुळे किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती सतत चर्चेत येत असते.दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या पोस्टमुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे.

हेमांगीला आता एका पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.आणि हा पुरस्कार हिंदी मालिकेतील भूमिकेमुळे हेमांगीला देण्यात आला आहे.यावेळी या पुरस्कार सोहळ्यात तिला आलेला आपला अनुभव तिने शेअर केला आहे. आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय असे हेमांगीने म्हटले. हेमांगी कवी ही झी वाहिनीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत भवानी चिटणीस ही व्यक्तीरेखा साकारत आहे. झी वाहिनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘झी रिश्ते अवॅार्डस् 2024’ मध्ये हेमांगीला सर्वोत्कृष्ट आई अर्थात Best Maa या श्रेणीत पुरस्कार मिळाला. आनंदाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर गेलेल्या हेमांगीने मराठीत आपले मनोगत मांडण्यास सुरुवात केली. 

पुरस्कार मिळाल्यानंतर हेमांगीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली,हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल #मातृभाषदिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् 2024 मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला! माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं! त्यानंतर ज्या प्रकारे @arjunbijlani आणि @haarshlimbachiyaa30 ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं!आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो!आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय!
जय महाराष्ट्र

अशा शब्दांत हेमांगींन तिच्या भावना व्यक्तकेल्या आहेत.तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.आपल्या भूमिकेनं आणि परखड वक्तव्यानं हेमांगीनं नेहमीच नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिची ही नवी पोस्टही खास चर्चेचा विषय आहे.

हे ही वाचा:

महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार

अमृतमय क्षण अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss