Saturday, July 27, 2024

Latest Posts

Quarantine असून देखील Dhananjay Munde करतायत काम!

देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे.

देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण जगभरात दोन वर्ष धुमाकूळ माजवणाऱ्या कोरोनाची लस आली. त्यामुळे सर्वांनाच एक दिलासा हा मिळालं होता. आता कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट भारतात दाखल झाला. अश्यातच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) याना कोरोनाची बाधा हि झाली होती. त्यामुळे सध्या कृषिमंत्री धनंजय मुंडे हे पुण्यातील (Corona Virus) निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. परंतु घरी क्वारंटाईन असून देखील ते अॅक्शन मोडवर दिसले आहेत.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही वसांपासून कोविड बाधित आहेत. त्यामुळे ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. तर आजपासून त्यांनी घरातून ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२३ ला धनंजय मुंडे यांनी यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, “नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.

तर आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनंजय मुंडे (Actione Mode ) यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (Maharashtra Council for Agricultural Education and Research) 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली. या बैठकीत कृषी परिषदेच्या ११२ व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

कोरोनाची सध्याची स्थिती –

सर्वातआधी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. आणि JN1 Covid या नवीन व्हेरियंटने आता राज्यामध्ये देखील शिरकाव केला आहे. सर्वात आधी या नवीन व्हेरियंटचा रुग्ण हा कोकण मध्ये आढळून आला आणि आता त्या पाठोपाठ ठाणे आणि पुणे या शहरात देखील याचे रुग्ण मिळाले आहेत. ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 प्रकारामुळे चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. नवीन व्हेरियंट JN.1 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. ठाणे शहरात पाच तर पुणे शहरात तीन रुग्ण या व्हेरियंटचे मिळाले आहे. यामुळे राज्यातील नव्या व्हेरियंटची संख्या दहा झाली आहे.

हे ही वाचा:

JN1 Covid मुळे धोका वाढला, Pune, Thane शहरात सापडले रुग्ण । CORONA | MUMBAI

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक जबरदस्त वेबसिरीज,घर बसल्या पाहयला मिळणार मनोरंजनाचा तडका

Bank Holiday in 2024 : तब्बल ५० दिवस असणार बँका बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss