Monday, May 20, 2024

Latest Posts

पुण्यात ४०० हजार कोटीचे ड्रग्ज सापडणे हे पुणे पोलिसांचे अपयश; रवींद्र धंगेकरांचा आरोप

मागील काही दिवसांपासून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचे रॅकेट सापडले आहेत. त्यावर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आरोप केला आहे. धंगेकर म्हणाले, पबमध्ये ड्रग्ज मिळतात. पुण्याची ओळख आता उडता पंजाबसारखी होत आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माहेरघरात हुक्का पार्लर, पब संस्कृती बंद व्हावी. पुण्यामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

पुण्यामध्ये सध्या संस्कृतीमुळे ड्रग्जचा महापूर वाहतोय, त्यामुळे पुण्यात पब नको, अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांनी घेतली आहे. पुण्यामध्ये ४०० हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणे हे पुणे पोलिसांचे अपयश आहे, असे धंगेकर म्हणाले. पुण्यामध्ये ड्रग्जप्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहेत, असे देखील धंगेकर म्हणाले. पुण्यात आणि इतर भागात ४०० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. तसेच पुण्यात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सापडला आहे. सरकारने संजीव ठाकूर यांना पाठीशी घालून कुठली ही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही. ललित पाटील प्रकरणात मी म्हणालो होतो, ड्रग्स प्रकरणी अंतराष्ट्रीय रॅकेट टोळी आहे. पुण्यामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी पब बाबत निर्णय घेतला मी दावा करतो की याच पबमध्ये ड्रग्स मिळतात. पब संस्कृती पुण्यात असू नये, हे पुणेकरांचे मत आहे. ४००० कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. कारण पोलिसांची यंत्रणा करतेय काय? गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एल आय बी काय करतायत, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ पंजाबमध्ये आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत आहे. २०१६ मध्ये कुरकुंभमध्ये करण्यात आलेल्या छापेमारीत त्याला पकडण्यात आले होते. त्यावेळेस त्याच्याकडून ३५० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अजूनही तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात मास्टरमाईंड’ची वैभव माने आणि हैदर शेख यांची ओळख झाली. त्यानंतर पुन्हा त्यांनी ड्रग्स प्रकरणाला सुरुवात केली. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या कोड वर्ड्स उघड, आरोपी वैभव मानेला ‘लंबा बाल’ आणि मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला ‘मुंबई का बंदर’ या नावाने ओळखले जायचे.

हे ही वाचा: 

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चं प्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाने थांबवलं मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा, CM Shinde यांची विशेष उपस्थिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss