Sunday, March 3, 2024

Latest Posts

सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक कसे असेल? छगन भुजबळ म्हणाले…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भिडे वाडा येथे येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच सावित्रीबाईंच्या काळातील जसं असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भिडे वाडा येथे येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच सावित्रीबाईंच्या काळातील जसं असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. या स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येईल . शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित बैठीकीत ते बोलले होते.

छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग या बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना आणि आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल. महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

२००८ साली वाडा पडून तिथे स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला होता.पण भाडेकरू म्हणून दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांनी इथून हटण्यास नकार दिला. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मध्यरात्री इथली अतिक्रमण हटवण्यात आली. त्यानंतर जिरणावस्थेत असलेले या वाड्याचे अवशेष पाडण्यात आले.

हे ही वाचा:

 जाणून घ्या मार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? 

सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द ; सहकार विभागाचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss