Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ भागात असणार पाणीपुरवठा बंद

पुण्यातील (Pune) नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.

पुण्यातील (Pune) नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. भामा आसखेडमधील प्रकल्पाच्या बांधकामा संबंधित कामासाठी उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. नवीन बांधण्यात आलेली पाईपलाईन मुख्य पाणी पुरवठ्याच्या जाळ्याला जोडण्यासाठी आणि ठाकरशी टाकीवरील दुरुस्तीचे काम उद्या केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुण्यामधील आदर्श नगर, कल्याणी नगर, हरिनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेश नगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल संकुल, विश्रांतवाडी सेक्टर ११२ अ, कस्तुरबा, टिंगरे नगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क,विमानतळ क्षेत्र, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी,मिस्टर पार्क,ठुबे पठारे नगर या परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २९ फेब्रुवारीला भामा आसखेड प्रकल्पांतर्गत ठाकरशी तलावामधील पाईपलाईनवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कालवा समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातसुद्धा पुणेकरांवरीची पाणी कपात टाळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कालवा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये त्यांनी धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेतला. त्यानंतरच पुण्यामध्ये पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. मागील २५ वर्षात झालेल्या पावसापेक्षा यंदाच्या वर्षी सगळ्यात कमी पाऊस पडला होता. मात्र हे सर्व असूनसुद्धा पुण्यात पाणी कपात केले जाणार नाही. उन्हाळ्यातसुद्धा पुणेकरांना पाणी मिळणार आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर निशाणा साधला?, जरांगे यांच्या मागे कोण…

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss