Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यातील गुंडाना दम देऊनही निलेश घायवळचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढल्याने शहरात सगळीकडे भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून त्यांना दम दिला होता. मात्र पोलिसांच्या आदेशानंतर भाई लोकांच्या कार्यकर्त्यांनी हे आदेश मोडकळीस आणले आहेत. गुन्हेगारांच्या परेडनंतर सुद्धा पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर पुण्यातील अनेक भाई दहशत माजवत आहेत. रिल्स व्हायरल करून सगळीकडे या गुंडानी त्यांची दहशत निर्मण केली आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील अनेक गुंड सोशल मीडियाद्बारे सगळीकडे गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ पोस्ट करत आहे. या सर्व गोष्टींवर पोलिसांनी बंदी घातली आहे. तरीसुद्धा सर्व नियम मोडीत काढून सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ यांनी गुन्हेगारी संबंधित रिल्स अपलोड केला आहे. निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीतील एक नामाकिंत गुंड आहे. निलेश घायवळवर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यांसारखे अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड परिसरामधील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. गजा मारणे सोबत बिनसल्यावर त्याने घायवळवर दोनदा हल्ला केला आहे. त्यानंतर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्यांच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. या हत्येमध्ये घायवळसह २६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. २०१९ मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याला बाकी गुन्हेंमध्ये जामीन मिळाला होता.

निलेश घायवळचे मूळ गाव जामखेड आहे. जामखेडमध्ये तो सध्या राजकारणात सक्रिय आहे. त्यातूनच तो राजकारणात आला आणि आमदार संतोष बांगर यांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अनेक विरोधीपक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांआधी पुण्यातील सर्व गुंडाना धारेवर धरले होते. त्यांना दम देखील देण्यात आला होता.

हे ही वाचा: 

Food Poisoning नंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

Mumbai Congress पक्षात राजकीय भूकंप, अजून एका नेत्याचा राजीनामा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss