Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Mumbai Congress पक्षात राजकीय भूकंप, अजून एका नेत्याचा राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसला धक्का बसण्यासारखी गोष्ट घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. काही दिवसांआधी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. त्यांनतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मिलिंद देवरा यांच्यासारखेच बाबा सिद्दिकी यांनी ट्विट करून माहिती देत काँग्रेस पक्षाला बाय-बाय केलं आहे. मुंबई येथील वांद्रे परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात बाबा सिद्दिकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची चिन्ह दिसून येण्याची शक्यता आहे.

कोणत्या गटात करणार प्रवेश? 

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते म्हणून प्रचलित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी त्यांचा राजीनामा काँग्रेस मोठा धक्का असणार आहे. १० फेब्रुवारी रोजी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे वांद्रे येथे आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात अजित पवार यांच्या गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे बाबा सिद्दीकी यांचे ट्वीट? 

I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express but as they say some things are better left unsaid. I thank everyone who has been a part of this journey.

मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि ४८ वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते पण ते म्हणतात ना, काही गोष्टी न सांगितलेल्या चांगल्या असतात. त्याप्रमाणे मी काही व्यक्त होत नाही. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ? 

बाबा सिद्दीकी यांची २००० ते २००४ या कालावधीत महाराष्ट्र सरकारचे म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

हे ही वाचा: 

लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात – CM Eknath Shinde

शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, Sanjay Raut यांच्याकडून पुन्हा एक फोटो ट्वीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss