Tuesday, May 21, 2024

Latest Posts

BJP चे तीन-तीन नवरे तरी विकास जन्माला नाही, Sanjay Raut यांची खोचक टीका

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Constituency) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ आज (रविवार, २८ एप्रिल) पुण्यातील सासवड येथे सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) यांचा समाचार घेतला. ‘गुजरातमधून दोन ऐरेगैरे येतात आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसतात,’ अश्या शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी एका महिन्यात २७ वेळा महाराष्ट्रात आले. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. देशाचे पंतप्रधान गेल्या १० वर्षांपासून रोज खोटं बोलतात. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता. महाराष्ट्रातले पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायची, हा उद्योग मोदी आणि शहा यांनी चालवला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातला झाला होता. महाराष्ट्रावर चाल करून येणारी व्यक्ती पंतप्रधान असली तारे आम्ही त्यांचा मान ठेवणार नाही. मोदी प्रचारसभेत खोटं बोलतात. त्यांनी मुस्लीम बांधवांविषयी बोलणे शोभते का?,” असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका प्रचारसभेत ‘काँग्रेस तुमचे मंगळसूत्रही ठेवणार नाही,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले, “ज्यांनी घरातील मंगळसूत्राचा मान ठेवला नाही त्यांनी मंगळसूत्राबाबत बोलू नये. देशातील हुकूमशाही उलथवून टाकायला हवी. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपने त्यांचं घर फोडलं. मराठी अस्मितेचं रक्षण करणारा शिवसेना पक्ष फोडला. पण त्यामुळे काय वाकड झालं? आजही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आहे. एकनाथ शिंदे यांचा गटाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो तर अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट म्हणतो. तुम्ही पाकिस्तानात जरी जाऊन विचारलात तरी कोणीही सांगेल शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

पुढे भाजपवर टीका करत ते म्हणाले, “भाजपने तीन-तीन नवरे केले पण त्यांना विकास जन्माला घालता आला नाही. भाजपने आधी ठाण्याचा नवरा केला. मग नांदेडचा नवरा केला. त्यानंतर, आता बारामतीचा विकास केला तरीही विकास जन्माला घालता आला नाही. अजित पवार म्हणतात मी विकास केला, पण शरद पवार यांनी हे सर्व निर्माण केलं नसतं तर तुम्ही बारामतीत अजून राजदूतवरून दूधच विकत बसला असतात.”

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

“Amit Shah आणि Yogi यांनी कोकणात येऊ नये”; भास्कर जाधवांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss