Sunday, May 12, 2024

Latest Posts

“Amit Shah आणि Yogi यांनी कोकणात येऊ नये”; भास्कर जाधवांचा इशारा

Loksabha Election च्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडल्याने तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराचा तडाखा सुरु झाला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे (Thackeray gat) खा.विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक विनायक राऊत विरोधात उभे असल्याने भाजपकडून आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Adityanath Yogi) हे नारायण राणेंच्या प्रचारासाठी कोकणात येत असल्याची माहिती आहे.

शनिवारी (२७ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Sindhudurg-Ratnagiri) लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे (Thackeray Gat) उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे प्रचार सभेत उपस्थित होते. या वेळी भाजपसह अमित शाह (Amit Shah) आणि आदित्यनाथ योगी (Adityanath Yogi) यांच्यावर “अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये अन्यथा कोकणातील जनता कोकणाच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही” अशा शब्दात टीका केली.

ते पुढे म्हणाले की, “खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. मात्र, त्यांनी या पैलवांनाना पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की, तुम्ही कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तर कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, इशारा भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिला.

दरम्यान, विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून २ वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे राणेंसमोर मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. कोकणाचा निकाल हा सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हे ही वाचा:

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss