राज्यभरातील विद्यार्थी SET साठी सज्ज, MAHARASHTRA-GOA केंद्रांवर होणार परीक्षा

राज्यभरातील विद्यार्थी SET साठी सज्ज, MAHARASHTRA-GOA केंद्रांवर होणार परीक्षा

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी गरजेची असणारी सेटची परीक्षा राज्यभरात रविवारी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) दिनांक ७ एप्रिल रोजी  आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोव्यातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी या परीक्षेसाठी जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. सेटची परीक्षा ही ऑनलाईन (Online) पद्धतीने न होता ऑफलाइन (Offline) पद्धतीने आतापर्यंत घेतली जात होती. उद्या अर्थात रविवारी होणारी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.

मागच्या वर्षी या परीक्षेसाठी १ लाख १९ हजार परीक्षार्थीनी नोंदणी केली होती. तर यावर्षी १ लाख २८ हजार २४३ परीक्षार्थीनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा  महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र (Hallticket) विद्यार्थ्यांना वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यभरात मराठी (Marathi) आणि इंग्रजी (English) प्रश्न आणि पर्याय समोर ठेऊन सेट (SET) परीक्षा घेतली जाते. सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट (NET) च्या आधारावर सेटची परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोवा (Goa) या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते.

हे ही वाचा:

ठाकरे गटाला मोठा धक्का, Babanrav Gholap करणार शिंदे गटात प्रवेश

Dr. Shrikant Shinde विक्रमी मतांनी जिंकून येतील- Ravindra Chavan

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version