Friday, May 17, 2024

Latest Posts

ठाकरे गटाला मोठा धक्का, Babanrav Gholap करणार शिंदे गटात प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrav Gholap) हे आज शिवसेना शिंदे गटात (Shivsena) प्रवेश करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrav Gholap) हे आज शिवसेना शिंदे गटात (Shivsena) प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज (शनिवार, ६ एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या(Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Loksabha Constituency) येथून शिवसेना उबाठा गटातून निवडणूक लढवण्यासाठी बबनराव घोलप उत्सुक होते. परंतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळेच घोलप हे आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत,


याबाबत बबनराव घोलप यांनी आज पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “माझ्यावर अन्याय झाला आहे. मी याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी माझी बाजू मांडणार असल्याचे सांगितले होते. पण, त्यांनी माझे म्हणणे मांडले नाही. मी राजीनामा देऊन दोन महिने उलटून गेले आहेत, तरीही अद्याप माझ्यापाशी कोणीही संपर्क साधला नाही. आणि म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.”

मिलिंद नार्वेकर यांच्यावर साधला निशाणा

बबनराव घोलप यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मिलिंद नार्वेकर कोण आहे? त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. तो एक शिपाई माणूस आहे तरीही त्याचे ऐकून घेतले जात आहे. मात्र आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. पक्ष फुटला तरीही त्याचेच म्हणणे ऐकून घेतले जात आहे. त्यांना एवढे महत्व का दिले जात आहे. मला संपर्कप्रमुख पदावरून का काढले? याचे उत्तर अद्याप दिलेले नाही.” बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर हल्लाबोल केला. आता आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच घोलप यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Latest Posts

Don't Miss