Saturday, March 2, 2024

Latest Posts

सुनील केदार रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद, भाजप नेते आशिष देशमुखांचा आरोप

सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ज्या पद्धतीने ललित पाटील याला तिथल्या अधिष्ठातांनी काही कारण नसताना दाखल करून घेतले तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणाची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

अनिल देशमुख म्हणाले, २२ तारखेला सुनील केदार यांना न्याल्यायाने शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या बहुतांशी सर्व चाचण्या ते योग्य असल्याचे सांगत असून या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे. ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना २२ वर्षानंतर न्याय मिळाला त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घेऊन तुरुंगवासापासून थांबवणे योग्य नाही, असे आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सुनील केदार हे नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिले आहे. त्याची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुनील केदार हे सध्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मायग्रेनचा त्रास असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनचा त्रास असल्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी होत आहे. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तेव्हा त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांना मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याचे तक्रार केली आहे. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मायग्रेनच्या उपचारासाठी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धुमाकूळ झाला सुरु, रुग्ण संख्या…

अरबाज खान  अडकला लग्नबंधनात,वयाच्या ५६व्या वर्षी गर्लफ्रेंड शुरा खानसोबत बांधली लग्नगाठ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss