Saturday, March 2, 2024

Latest Posts

लातूरच्या शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदावरून गावकऱ्यांमध्ये राडा

लातूरमधील (Latur) औसा तालुक्यातील लामजनामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

लातूरमधील (Latur) औसा तालुक्यातील लामजनामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. समितीच्या सदस्यांनी शाळेतच हाणामारी (School Free Style Fighting)करायला सुरुवात केली त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले. गावकऱ्यांमध्ये घडलेला सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आला. शाळेची प्रगती होण्यासाठी गाव पातळीवर शिस्तपालन समिती काम करत असते.

गावातील काही नागरिक आणि शाळेतील शिक्षक यांच्यात समन्वय ठेवत पाल्याच्या उन्नतीसाठी शिस्तपालन समिती गाव पातळीवर काम करते. यांच्या निवडीवरून बेशिस्त वर्तनामुळे त्याच्यात राडा झाला. हा सर्व राडा मोबाईल कैमेरामध्ये कैद झाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून शाळेतील पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये राडा झाला. लाझमान मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. गावातील काही लोकांनी मुदामून वाद घातल्याचा आरोप पालकांनी केला आहे. काही पालक हातात दगड घेऊन काही नागरिकांना समोरासमोर भिडले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. लातूरमधील औसा तालुक्यातील लामजना गावात शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या वेळी मोठा गोंधळ झाला आहे. सर्वसाधारण गटातून तीन ऐवजी पाच पालकांचा समितीमध्ये समावेश करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली होती. या मागणीवरून पालक आणि शिक्षक यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणाला सुरुवात झाली.

निवड करत असताना मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या राड्यात काही व्यक्तींनी दगड हातात घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. घडलेला हा सर्व प्रकार काही लोकांनी मुद्दामून घडवून आणल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या सर्व प्रकारांत दोषी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .

हे ही वाचा:

Lok Sabha Election – येणाऱ्या निवडणुकीला घेऊन मविआचा काय असणार फॉर्म्युला ?

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटात होणार नवीन पवारांची एन्ट्री?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss