Saturday, March 2, 2024

Latest Posts

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटात होणार नवीन पवारांची एन्ट्री?

शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील आणखी एक व्यक्ती राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या उलथापालथी या होत आहेत. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत एकत्रित झाले. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचा इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर पक्षात अनेक मोठंमोठ्या घडामोडी या घडल्या आहेत. राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis) शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पक्षात पडले आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. या सर्व घडामोडी नंतर राज्यात अनेक राजकीय छोटे मोठे भूकंप हे होतच आहेत. नुकतंच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे संपले आहे. तर आता शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील आणखी एक व्यक्ती राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे.

अजित पवार यांच्या फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांचे विश्वास दिलीप वळसे पाटीलसुद्धा अजित पवार यांच्याबरोबर गेले. तर आता रोहित पवार यांनी शरद पवार याना साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज्यात युवा संघर्ष यात्रा काढली. तर आता शरद पवार यांच्या गटात लवकरच पवार कुटूंबियातील आणखी एका व्यक्तीची एंट्री होणार आहे. शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करण्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

श्रीनिवास पवार हे एक उद्योजक आहेत. त्यांचा शरयू ग्रुप आहे. हा ग्रुप कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे. श्रीनिवास पवार राजकारणापासून बाहेर राहतात. शरद पवार त्यांचे काका आहेत. परंतु आता त्याचा मुलगा युगेंद्र राजकारणात येत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसोबत दिसून आले. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे युगेंद्र पवार आयोजक आहेत. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss