Friday, May 17, 2024

Latest Posts

ED चौकशीआधी Rohit Pawar यांचं कार्यकर्त्यांना केले आवाहन!, घाबरु नका…

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय. पुढच्या तीन दिवसात महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. अश्यातच उद्या आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ED चौकशी ही होणार आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत (ED Office) सोडायला जाणार आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे. अश्यातच नुकतंच रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन हे केले आहे.

सरकारच्या दबावाखाली ईडीने (ED) काही चुकीची कारवाई केली तर घाबरुन जाऊ नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ईडी (ED) चौकशीबाबत दिली आहे. ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं तसंच आताही करणार आहे. शरद पवार बाप माणूस म्हणून ढाल बनून उभे राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा आहे, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे. तसेच रोहित पवार पुढे म्हणाले आहेत की, उद्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार माझ्यासोबत येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय! रोहित पवार पुढे म्हणाले आहेत की, ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं. तसंच आताही करणार मात्र सूडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे.

ईडीची नोटीस का आली?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑगस्ट २०१९ च्या एफआयआरमधून समोर आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात त्यांनी संघर्ष यात्रा सुद्धा काढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना ईडीची नोटीस येऊन धडकली आहे.

हे ही वाचा:

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान

नीता अंबानींसह मुकेश अंबानी अयोध्येत…, रामनगरीत उद्योगपतींचा महापूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss