Wednesday, May 22, 2024

Latest Posts

संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश, गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी तर ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक…

हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणाऱ्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पगल किराडपुरा घटणे नंतर आज त्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांनी हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देऊन दंगलीचा डाग पुसल्याचे चित्र समोर आले आहेत .

हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणाऱ्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पगल किराडपुरा घटणे नंतर आज त्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांनी हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देऊन दंगलीचा डाग पुसल्याचे चित्र समोर आले आहेत . यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आल्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताची अडचण होण्याची शक्यता होती. सोबतच, कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत आणि दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी घेतलेल्या बैठकीनंतर महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दौलताबाद येथे गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संभाजीनगर शहरातील ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक दोन दिवस उशिराने काढण्याचा निर्णय झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून, गणेश विसर्जन पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी गणेश मंडळांकडे केली होती. पोलिसांच्या याच विनंतीला मान देत दौलताबाद येथे गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील महत्वाच्या ६ गणेश मंडळांनी आपला पाठींबा नोंदवला आहे.

दरवर्षी लाखो मुस्लीम बांधव ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त दौलताबादमार्गे खुलताबादला जात असतात.या ठिकाणी मोठया प्रमाणात मुस्लिमबांधव येत असतात . दरम्यान, यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद सण एकाच दिवशी आले आहे. विशेष म्हणजे, दौलताबादमधील मुख्य मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव दौलताबादमार्गे खुलताबादला जाणार असल्याने गणेश विसर्जन मिरवणूक देखील रस्त्यावर आल्यावर पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढू शकतो. तसेच, वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील हिंदू बांधवानी ईदनिमित्ताने एक दिवस उशिरा गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकीकडे संभाजीनगर शहरातील मुस्लीम बांधवांनी देखील एकतेचा संदेश दिला आहे.आज शहरात मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. अशातच आज ईद-ए-मिलाद सण असल्याने मुस्लीम बांधवांकडून देखील शहरात मिरवणूका निघतात. पोलिसांच्या विनंतीला मान देत मुस्लीम बांधवांनी दोन दिवस उशिरा मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारे चित्र समाजापुढे आले आहे.

हे ही वाचा: 

Lalbaugcha Raja Visarjan 2023, १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी होणार मार्गस्थ

युद्ध, नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगली, प्लेग या संकटाना बाप्पाने कसे टाकले मागे..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss