Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Lalbaugcha Raja Visarjan 2023, १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी होणार मार्गस्थ

आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात दिवस आहे. ठिकठिकाणी गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात दिवस आहे. ठिकठिकाणी गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा आणि लालबाग-परळकरांसोबतच देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आज विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे.

आता लालबाच्या राजाची उत्तरपूजा ही सुरु आहे. त्यांनतर थोडा वेळात राजाची शेवटची आरती हि मंडपात केली जाणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यामध्ये कोळी बांधवांकडून मानवंदना दिली जाते. मंडळाच्या सुरुवातीच्या वर्षांपासूनचीही परंपरा आहे. १० दिवस लालबागच्या (Lalbaugcha Raja Visarjan) गणेश नगरात विराजमान असलेला लालबागचा राजा आज ११ वाजता विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. लाडक्या गणरायाला स्वरांजली बँड पथक सलामी देत आहे. गुलाल उधळत, मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकांवर पोलिसांचं विशेष लक्ष असेल. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होत असतात. त्याकरता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

उद्या शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर शेवटची आरती करून लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा अरबी समुद्रात सुरू होईल. सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती आहे. त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.

श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन उजवे वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोड ने भारतमाता जंक्शन भारतमाता जंक्शन येथून पुन्हा उजवे वळण घऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने गरमखाडा जंक्शनला उजवे वळण घेणार. पुढे साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका-ना. म. जोशी मार्गाने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दलासमोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड-संत सेना महाराज मार्ग-सुतार गल्ली माधव बाग- व्ही.पी. रोड-ऑपेरा हाऊस- गिरगांव चौपाटी- गिरगांव असा विसर्जन मार्ग आहे.

लालबाग-परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूकांकरता मुंबई पोलिसांची व्यवस्था

केवळ लालबाग-परळ भागांत- ३०० सीसीटीव्ही
महिला सुरक्षेकरता ६ छेडछाडविरोधी पथक
मोबाईल चोरी करता ६ विशेष पथके
एटीएस – आतंकवादी कारवाया रोखण्याकरता ३ बॉम्ब शोधक नाशक पथके
रॅपीड अॅक्शन फोर्सची नियुक्ती
५ एसआरपीएफ ची पथके
३ दंगलनियंत्रक पथके
३ सिसीटीव्ही व्हॅन
२५०० पोल्स मित्र कार्यकर्ते
६ वॉच टॉवर्स

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss