Tuesday, May 21, 2024

Latest Posts

‘घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकत नाही त्यांनी…’ Sanjay Raut यांची PM Modi यांच्यावर जहरी टीका

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेचा समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीचा (Sanjay Raut) पहिला टप्पा पार पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अश्यातच, शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) केलेल्या टीकेचा समाचार घेत संजय राऊत यांनी,” जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये,” अश्या शब्दात समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांनी आज (गुरुवार, २५ एप्रिल) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांच्यासह विरोधकांवर तुफान टीका केली. संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी हे निवडणुका हरणार आहेत. ४ जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल. देशात ७० वर्षांत त्यातील ५० वर्षापेक्षा जास्त काँग्रेसने प्रधानमंत्री दिला आहे, सर्वात चांगले प्रधानमंत्री झाले आहेत. या सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे तो देश विकण्याचा काम एकच प्रधानमंत्री करत आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. ज्यांच्याकडे बहुमत आहे तो त्या पदापर्यंत जाईल, दहा वर्षापर्यंत तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात. आमच्याकडे एकाहून जास्त चेहरे पंतप्रधान पदासाठी आहेत. एक सक्षम नेता या देशाचा पंतप्रधान बनणार आहे. यावर चर्चा होऊ शकते, त्यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही हे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना ‘इंडिया आघाडी तुमचे मंगळसूत्रही ठेवणार नाही,’ असे वक्तव्य केले होते. यावर संजय राऊत म्हणाले, “तसे नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत, पाकीट मारी करायला लागले आहेत, ही भाजपची भूमिका आहे का ? खरं तर काँग्रेसच्या राज्यात नाही तर भाजपच्या राज्यातच महिलांचे मंगळसूत्र गहाण पडत आहेत. जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये. या देशातील महिलांची मंगळसूत्र का लुटली गेली का विकली गेली, मोदींनी नोट बंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केले हजारोंचा जो रोजगार गेला त्यावेळेला लाखो महिलांना आपले मंगळसूत्र विकून आपले घर चालवावे लागले. काश्मीर मधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत, भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूर मध्ये देखील महिलांची मंगळसूत्र गेली त्याला देखील मोदी जबाबदार आहेत, किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली?”

हे ही वाचा:

सत्ता जाण्याच्या भीतीने विरोधक घाबरले आहेत, Rahul Gandhi यांचा PM Modi, BJP वर हल्लाबोल

Sanjay Raut म्हणजे वाया गेलेली केस, Gulabrao Patil यांची खरमरीत टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss