ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आणि उद्या मालवण दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या सभेचे मालवणमध्ये आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, अठरा पगड जातीमध्ये विखुरला गेलेला हा आपला मराठी माणूस आहे. आता तर निवडणूक आहे याआधी निवडणुका नव्हत्या. फजखान भेटीला आला होता तेव्हा ईव्हीएम नव्हती, आणि त्यावेळेस त्यांनी जी मगरमिठी मारली आणि त्याने जो वार केला.जर मी लेचापेचासारखा गेलो असतो तर काय झालं असत. शत्रू समोर किती बलाढ्यानीशी असू देत आपण तयारीने जाऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते. घोटाळा, घोटाळा. त्यांना अटक होत असेल तर गणपत गायकवाड यांनी जे दुसरे स्टेटमेंट केले आहे की, त्यांचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, की चौकशी न होता क्लीनचीट ही मेरी मोदी गॅरंटी आहे हे आता कळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराजांपासून काय शिकलो काय शिकलो नाही, महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांना महाश्रय लुटणारे हे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. महाराष्ट्र लुटत आहेत. पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होतो आणि आहे कि यावेळेस नौदल दिन मालवणमध्ये साजरा करण्यात आला. तुमच्या पैकी अनेकांनी बघितला असेल. मी मुंबईमध्ये मागे बघितलं होत आपल्या स्वतंत्र हिंदुस्तानचं आरमार आणि त्याची शक्ती. या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आपल्या हिंदुस्तानामध्ये आरमार हा प्रकार आधी कुठेही नव्हता, नौदल, त्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इथे आले आणि त्यांनी पुतळ्याची स्थापना केली. पण एवढे आल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले नाही. आर्शिर्वाद घ्याचा ते विसरले. पण मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. ५० खोके तर तुम्ही गिळलेच,पण आता जे दिसेल ते खाऊ. तुम्ही सिंधुदुर्गात ते बघितला म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी मनापासून सांगतो, मी इथून सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. महाराष्ट्राला सांगणार आहे, काळजी करु नका. जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिले आहे. तेव्हा जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना? त्यावेळी शिवसैनिक तुमच्यासोबत नसते आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सिंधुदु्र्ग कुणाच्यातरी खासगी सातबाऱ्यावर चढवला गेला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
शरद पवार कधी मारतील याची तुम्ही वाट बघत आहेत: जितेंद्र आव्हाडांनी साधला अजित पवारांवर निशाणा
मराठी पडदा गाजवायला सज्ज, नवरा माझा नवसाचा २ मध्ये पुन्हा एकत्र येणारं अशोक सराफ-सचिन पिळगावकर