Sunday, May 19, 2024

Latest Posts

…पायाखाली आग तरी आमची डोकी थंड कशी, अजित पवारांच्या निषेधार्थ नवी मुंबईमध्ये काढण्यात आला मोर्चा

भाजप गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील कामोठे परिसरात देखील आज अजित पवार यांच्या निषेधार्थ भाजपकडून मोर्चा काढण्यात आला.

काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेमध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं होत. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर नाराजीचे सूर उमटले गेले. त्यांनी माफी मागावी किंवा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महाराष्ट्रातील अनेक स्थरावरून केली जात होती. भाजप गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील कामोठे परिसरात देखील आज अजित पवार यांच्या निषेधार्थ भाजपकडून मोर्चा काढण्यात आला.
अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अशा आशयाचे एक वादग्रस्त विधान केले होते. त्याच निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कामोठेने आज कामोठे येथे मोर्चा काढला. या मोर्चाच्या वेळी बोलताना भारतीय जनता पार्टी कामोठेचे महामंत्री सुशीलकुमार शर्मा यांनी समस्त हिंदूंना आव्हान केले. यावेळी सुशीलकुमार शर्मा बोलले,”आजच्या तारखेची स्थिती बघता एकाच म्हणावेसे वाटते, शिवरायांच्या भूमीवरही सारे षंढ कसे,पायाखाली आग तरी आमची डोकी थंडी कशी?”,असा सवाल त्यांनी हिंदूंना केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी सर्वांना आव्हान केलं आहे कि,”ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची ओळख आहे अशा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुत्राबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेद करावा. काँग्रेस गेली सत्तर वर्ष मुस्लिम समाजाच्या वोटिंगवर राजकारण करत आले आहे. मात्र आता त्यांची राकीय कारकीर्द संपत आली आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी शरद पवार,अजित पवार, जितेंद्र आव्हाड असे हिंदू विरोधी वक्तव्य करत आहेत. आपण लहानपणापासून इतिहास शिकत आलो आहोत. त्यामध्ये आपल्याला हेच शिकवलं गेलं कि, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करायला सांगितले होते मात्र छत्रपती संभाजी महाराज यांनी ४० दिवस नरक यातना भोगल्या पण हिंदू धर्म सोडला नाही. अशा धर्मवीराला ते धर्मवीर नव्हते असं बोलणाऱ्या अजित पवार यांचा निषेद केला पाहिजे,”असं आव्हान यावेळी त्यांनी केलं.
त्याच बरोबर त्यांनी अजित पवार यांच्या जिथे कुठे सभा होतील त्या उधळवून लावण्याचे देखील आव्हान केलं आहे. “खऱ्या अर्थाने आता हिंदूंचं राज्य आले आहे. हिंदूंच्या राज्यात आम्ही कोणत्याही प्रकारचे हिंदू विरोधी वक्तव्य सहन करणार नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही राज्यकर्त्याने मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही धर्माचे असो, वा कोणत्याही प्रांतातून आलेला असो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल, हिंदू देवतांच्या बद्दल, हिंदू वारकऱ्यांच्या बद्दल किंवा हिंदू समाजाबद्दल कोणतीही द्वेषाची भावना ऐकून घेणार नाही. आज फक्त मोर्चा काढलेला आहे, त्यावेळी तुमच्या घरावर दगडफेक करू, दिसाल तिथे ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही”,असा इशारा त्यांनी दिला आहे. यापुढे तुम्ही हिंदू भूमीत उभे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत उभे आहेत या गोष्टीचे भान ठेऊन वक्तव्य कराल अशी आशा व्यक्त केली आहे .
त्याच बरोबर त्यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील मत मांडलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘जाणता राजा म्हणण्याची गरज नाही’, असं विधान केलं होत. त्यावर सुशीलकुमार शर्मा म्हणाले,”मग काय तुम्हाला जाणता राजा म्हणावं का?असा सवाल केला. यापुढे ते म्हणाले,”तुम्ही कसले जनता राजा तुम्ही तर राज्याच सहकार क्षेत्र लुटून खाल्ले,महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटून खाल्लं, तुम्ही कसले जनता राजा?” त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर नव्हता तसेच अफजलखान हा त्याच्या सीमाच रक्षण करण्यासाठी आला होता असं विधान केलं होत.त्यावर शर्मा म्हणाले,”ज्याने हिंदुस्थानातील भगिनींनीची अब्रू लुटली, ज्याने हजारो मंदिर तोडले, ज्याने वेळोवेळी आक्रमणे करून आपली भूमी बळकावण्याचे काम केले तो क्रूर नव्हता?, त्याचबरोबर अफजलखानाने येताना तुळापूर च मंदिर उद्वस्त केलं होता,” असे दाखले दिले. पुढे सुशीलकुमार म्हणालेकी,”फक्त मुस्लमान्यांच्या ३ टक्के मतांसाठी हे हिंदू विरोधी वक्त्यव्य करतात.”
या मोर्च्याच्या वेळी भारतीय जनता पार्टी कामोठेचे महामंत्री सुशीलकुमार शर्मा यांच्यासोबत कामोठेशहर अध्यक्ष रवी जोशी, विजय चिपळेकर, युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील,त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कामोठेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss