Tuesday, April 23, 2024

Latest Posts

डोंबिवलीमध्ये भररस्त्यात रोड रोमियोकडून महिलेची छेडछाड, रोड रोमियोवर गुन्हा दाखल

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच डोंबिवलीमध्ये रोड रोमियोने भररस्त्यामध्ये एका महिलेची छेड काढली. ही घटना डोंबिवलीमधील आजदेपाडामध्ये भर रस्त्यामध्ये घडली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. भर रस्त्यामध्ये महिलेची छेड काढल्यानंतर स्थानिक तरुणांनी रोड रोमियोला चांगलाच चोप दिला आहे. त्याच्यावर मानपाडा पोलिसांत (News on manpada police in Marathi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर रोड रोमियोंवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. प्रितम सुनिल गायकवाड असे रोड रोमियोंचे नाव आहे.

डोंबिवलीमध्ये राहणारी पीडित महिला मुंबईमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये कामाला गेली होती. त्यानंतर ती नेहमीप्रमाणे डोंबिवली स्टेशनवरून कल्याण डोंबिवली मनपा परिवहन मंडळाच्या बसने डोंबिवलीतील घारडा सर्कलला उतरून चालत घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी रोड रोमियो प्रितम सुनिल गायकवाड याने भररस्त्यामध्ये महिलेचा गळा दाबला. तिचा गळा दाबल्यानंतर जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने जोर जोरात किंचाळी मारायला सुरुवात केली. किंचाळी मारल्यानंतर बाजूच्या बंगल्यामध्ये क्रिकेट खेळत असलेले सर्व तरुण बाहेर आले. त्यानंतर प्रीतम गायकवाड याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. नंतर त्याला डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी लगेच घटना स्थळी धाव घेऊन प्रीतमला ताब्यात घेतले. प्रीतम गायकवाड हा अंधेरी मरोळ मध्ये राहणारा असून तो डोंबिवलीमध्ये त्याचा नातेवाईकांकडे आला होता.

हे ही वाचा:

अभिनेत्री पूनम पांडेचं वयाच्या ३२ व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरने निधन,सोशल मीडियावरील पोस्ट खळबळजनक

Raj Thackeray Live: काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार, नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss