Saturday, March 2, 2024

Latest Posts

दारू पार्टीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या

दारू पार्टीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.

दारू पार्टीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तिघांनी मिळून या व्यक्तीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह खाडीमध्ये फेकून दिला. पण पोलिसांनी आरोपीला शोधून त्यांच्यावर कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

दारू पार्टीदरम्यान त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून तीन जणांनी फुले नगरमधील एका ४४ वर्षाच्या इसमाची हत्या केली. त्याचा मृतदेह डोंबिवलीतील (Dombivali) देवीचापाडा (Devichapada) येथील खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोमनाथ शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच त्याला ठार मारणाऱ्या योगेश डोंगरे आणि विलन विष्णू टावरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा मारेकरी दीपक करकडे याचा पोलीस शोध घेत आहेत. डोंबिवली पश्चिमेमधील देवीचापाडा खाडी किनारी एका पुरूषाचा मृतदेह खाडी किनारी तरंगत असल्याची माहिती देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मयताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा होत्या.

पोलिसांनी तातडीने तपास करून दोघा आरोपींना डोंबिवलीतील उमेशनगर आणि मोठागाव भागातून अटक केली. मृत आणि आरोपी एकमेकांचे परिचित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला ठार ठार मारून त्याचा मृतदेह खाडीमध्ये फेकून दिला होता.

हे ही वाचा:

मराठी पाट्याप्रकरणी BMC आली ऍक्शन मोडमध्ये, १७६ दुकानांवर कारवाई

चेहऱ्यावर झटपट नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आहारात ‘या’ पेयांचा समावेश करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss