Saturday, July 27, 2024

Latest Posts

घरातील लहान मुलांवर तुमचं ल लक्ष आहे? लपाछपी खेळताना मुलाच्या हातात घुसला रॉड

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. तसेच लहान मुलांच्या बाबतीत तर अनेक गोष्टी या समोर येत आहेत.

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. तसेच लहान मुलांच्या बाबतीत तर अनेक गोष्टी या समोर येत आहेत. अनेकांच्या घरात लहान मुलं असतात. आणि लहान मुल असली की ती लोक बाहेर खेळायला जात असतात. सोसायटी किंवा इमारतीच्या प्रांगणात खेळणारी आपली मुलं नेमकी कुठं आहेत? ती सुरक्षित ठिकाणी खेळतायत का, यावर पालकांनी नजर ठेवण्याची गरज आहे. नुकतीच वसईतील एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

वसई पश्चिमेच्या (Vasai News) गायत्री मंदिराजवळ सोमवारी रात्री लपाछपी खेळताना एका १४ वर्षांच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना घडली. सोमेध जाधव असं त्याचं नाव आहे. तो सध्या नववीत आहे. सुमेध ज्या सळईवर पडला तो लोखंडी रॉड बाणाच्या आकाराचा होता. सहा इंच तो रॉड हातात घुसलण्याने सोमेध तेथेच अडकून राहिला. परिसरातील नागरीकांनी लोखंड कापण्याच्या मशिनने तो रॉड कापून, जवळच्या रुग्णालयात त्याला नेलं. तिथं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या दंडातला रॉड काढण्यात यश मिळवलं. त्यामुळं सोमेध जाधवची प्रकृती आता स्थिर आहे.

 

वसईत लपाछपी खेळताना ग्रीलच्या वरील रॉड एका लहानग्याच्या शोल्डरच्या खालील हातात शिरला आहे. लोखंडी गेटवरून पलीकडे उडी मारण्याच्या प्रयत्नात सोमेधचा हातात बाणाच्या आकृतीचा रॉड घुसला आणि तो तिथंच अडकून पडला. वसई पश्चिमेच्या गायत्री मंदिर जवळ सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान काही मुले लपाछपी खेळत होता. लपाछपी खेळताना सोमेध तेथील लोखंडाच्या गेटवर चढला आणि दुस-या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय सटकला आणि तो लोखंडी सळईवर पडला.शहरांमध्ये इमारतीच्या टेरेसवर मुलांचं खेळणं काही नवीन नाही. मोठ्या संख्येनं मुलं या ठिकाणी खेळताना आपणाला सर्रास दिसून येतात. त्यामुळं पालक देखील निश्चिंत असतात. असं असलं तरी पालकांनी आता अधिक सतर्क होण्याची आणि मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss