Sunday, May 19, 2024

Latest Posts

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनरबाजी, मॉर्डन अफजलखानाचे करायचे काय?

कालरात्री भांडुपमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा मॉर्डन अफजल खान असा उल्लेख करणारे खळबळजनक बॅनर लावण्यात आले. त्यामुळे या वादाने एक नवीन वळण घेतल्याचे दिसून येते.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबच्या मुद्यावरून राजकीय वातावरणात रोज नवीन वाद निर्माण होताना दिसतो आहे. जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब हिंदुद्वेष्ट नव्हता, असं विधान केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिल होत, मात्र तरी हा वाद संपला नव्हता. त्यातच कालरात्री भांडुपमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा मॉर्डन अफजल खान असा उल्लेख करणारे खळबळजनक बॅनर लावण्यात आले. त्यामुळे या वादाने एक नवीन वळण घेतल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब याने विष्णूचे मंदिर पाडलं नव्हतं.असं विधान केलं होत. यावरून औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता का असं आव्हाडांना म्हणायचं आहे का ?, असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाडांनी यावर स्पष्टीकरण देखील दिल होत. मात्र हा वाद अद्याप सुरूच आहे. आज भांडुपच्या रस्त्यांवर आव्हाडांविरुद्ध बॅनर लावण्यात आले ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा अफजलखान, असा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. हे बॅनर्स कोणी लावले हे अद्याप समजले नसून रात्रीच्या अंधार हे बॅनर्स लावण्यात आले असतील अंदाज व्यक्त केला जातोय.

भांडुप येथील पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने हे बॅनर्स लावण्यात आले असून, त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख मुंब्रा सम्राट जितुउद्दीन खान, असा करण्यात आला आहे. या बॅनर्स वर लिहण्यात आलेला मजकूर,”मुंब्रा रक्षक जितूउद्दीन खान. महाराज… औरंगजेबाचे उद्दातीकरण करणाऱ्या मॉडर्न अफजल खानाचे (जितूउद्दीनचे) करायचे काय? तुम्हीच सांगा महाराज,” असा आहे. काही ठिकाणी ‘मुंब्रा सम्राट जितुऊद्दीन खान’, असा देखील उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाच फोटो आहे आणि त्याच्या बाजूलाच जितेंद्र आव्हाड यांचा अफजल खानाच्या वेशातील फोटो आहे. या बॅनर्स मुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या बॅनर्सची चर्चा सुरु झाल्यानंतर, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर जाऊन हे बॅनर्स काढले. राज्यातील सामाजिक बांधिलकीआणि एकोपा कायम राहावा आणि यातून कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी हे बॅनर्स काढण्यात आले असून हे अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स असल्याने ही कारवाई केल्याचं देखील महापालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे यावर जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच राहणार आहे.

हे ही वाचा:

अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा ‘कलादर्पण’ पुरस्कार सोहळा जल्लोषात पार

नामांतर राहिले बाजूला आता थेट होणार विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

नारायण राणेंनी संजय राऊतांना डिवचलं, पुन्हा जेलवारी घडवणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss