Thursday, May 16, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. आज धर्मवीर आनंद दिघे यांना जाऊन २१ वर्ष झाले. त्यानिमित्त आज सकाळी ठाकरे गटाचे नेतेआणि कार्यकर्ते आनंद आश्रमात दाखल झाले होते. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आनंद आश्रमात पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणत आनंद आश्रम परिसरात जमले आहे. या वेळी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

या वेळी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांच्या फोटोला फुलांनी सजवण्यात आले आहे. याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण, याच आनंद आश्रमचे नाव शिंदे गटाकडून बदलण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम, एकनाथ शिंदे असे नवे नामकरण आनंद आश्रमचे करण्यात आले आहे.

तर काल ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे अंजी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. जांभळी नाका येथे उद्धव ठाकरे गटाकडून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचं उदघाटन करण्यात आलं. तर या वेळी उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांशी संवाद साधला. लवकरच ठाण्यामध्ये सभा घेण्यात येणार आहे अशी घोषणा या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. सध्या राजकारणात विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे. तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा अभिमान आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी केले १२०० पानांचे आरोपपत्र दाखल, ओरेवाचे एमडी जयसुख पटेलांच्या नावाचाही समावेश

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार!, अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींनी केली परीक्षा पे चर्चा, ३८ लाख विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss