Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Kalyan-Dombivali करांची पाण्याची चणचण संपणार, नव्या धरणाची होणार निर्मिती !

कल्याण – डोंबिवलीकरांची (Kalyan Dombivali) पाण्याची समस्या आता संपणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शहरामध्ये स्वतंत्र धारणाची आवश्यकता असून लवकरच ते बांधणार असल्याची घोषणा केली आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या ‘‘विकास दशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कल्याण मतदारसंघात वेगाने शहरीकरण झाले आहे. पाण्यासाठी इथे स्वतंत्र धरणाची आवश्यकता असून ते बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “जनता हेच आपले टॉनिक असून घरात बसून कामे होत नाही. आमचे सरकार रस्त्यावर उतरुन काम करते. ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाचे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आतापर्यंत साडेपाच कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.”

पुढे ते म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांच्या अहवालातील प्रत्येक पानातून खासदाराने सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकासाचे काम केल्याचे दिसून येते. एक आदर्श खासदार, लोकप्रतिनिधी इथल्या मतदारांनी दिल्लीत पाठवला. कार्यअहवाल पाहून अभिमान वाटला. श्रीकांतची गाडी राईट ट्रॅकवर आणि फुल स्पीडमध्ये आहे. तो आता खासदार नाही तर संसद रत्न आहे.” यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत शिंदे यांची कौतुकाने पाठ थोपटल्याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांसमोर सांगितली. “सुरुवातीच्या पाच वर्षात श्रीकांत शिंदे याने कामाच्या माध्यमातून स्व:ताची ओळख निर्माण केली. इथले लोक सांगतात ‘फिर एकबार श्रीकांत ही खासदार’, कल्याणच्या जनतेने श्रीकांतला खासदार म्हणून स्वीकारले आहे,” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांच्यावर घणाघात

Mahayuti मध्ये Nashik Loksabha Constituency चा तिढा कायम; Shivsena, NCP नंतर आता BJP ही मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss