Sunday, May 5, 2024

Latest Posts

वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांच्यावर घणाघात

नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचे नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. अयोध्येत राम मंदीर झाले, बाळासाहेब असते तर भरभरुन कौतुक केले असते पण त्यांनी आनंदही व्यक्त केला नाही हे दुर्देवी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नकली शिवसेनाची उपमा योग्य आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या ‘‘विकास दशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थितीत होते. श्रीकांत शिंदे यांच्या अहवालातील प्रत्येक पानातून खासदाराने सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकासाचे काम केल्याचे दिसून येते. एक आदर्श खासदार, लोकप्रतिनिधी इथल्या मतदारांनी दिल्लीत पाठवला. कार्यअहवाल पाहून अभिमान वाटला असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की श्रीकांतची गाडी राईट ट्रॅकवर आणि फुल स्पीडमध्ये आहे. तो आता खासदार नाही तर संसद रत्न आहे असे कौतुक त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी श्रीकांतची कौतुकाने पाठ थोपटल्याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली.

सुरुवातीच्या पाच वर्षात श्रीकांत शिंदे याने कामाच्या माध्यमातून स्व:ताची ओळख निर्माण केली. इथले लोक सांगतात ‘फिर एकबार श्रीकांत ही खासदार’, कल्याणच्या जनतेने श्रीकांतला खासदार म्हणून स्वीकारले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर्य आहे, याउलट त्यांनी ५० कोटी रुपये बँक खात्यातून काढून घेतले कारण त्यांना आता आचार विचार उरलेला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हनुमान चालिसा म्हटल्याने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना या निवडणुकीत रामभक्त आणि हनुमानभक्त जागा दाखवतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहेत. पुढे २५ ते ५० वर्षाचा विचार करणारा व्हिजनरी लीडर श्रीकांत शिंदे आहे. मुंब्र्यातील मुस्लिम समाज विकासाचे समर्थन करत आहे. मोठ्या खासगी हॉस्पिटलला लाजवेल असे महापालिकेचे हॉस्पिटल तेही कॅशलेस सुविधा असणारे हे एकमेव आहे, असे त्यांनी सांगितेल. ते पुढे म्हणाले की मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन्स केली. अनेकांचे गळ्याचे पट्टे गेले काहीजण पळायला लागले. अहकांरी लोकांनी आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान केले. बाळासाहेबांच्या विचारांवर २०१९ ला लोकांच्या मतांनी युतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते मात्र काँग्रेसला डोक्यावर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. आम्ही २०२२ मध्ये चूक दुरुस्त केली आणि महायुतीचे सरकार स्थापन केले, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Mahayuti मध्ये Nashik Loksabha Constituency चा तिढा कायम; Shivsena, NCP नंतर आता BJP ही मैदानात

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना सोयीसुविधा पुरवा – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss