Monday, May 6, 2024

Latest Posts

PM Modi यांच्यामुळे आपला देश अर्थव्यवस्थांमध्ये…काय म्हणाले Dr. Shrikant Shinde?

अंबरनाथ पूर्व येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी (Dr. Shrikant Shinde) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अंबरनाथ (Ambernath) शहरात १० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक असून नाट्यगृह, मेडिकल कॉलेज, शूटिंग रेंज, यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, हॉस्पिटल, शिवमंदिर परिसर विकास अशी सर्वाधिक कामे अंबरनाथ शहरात केल्याचे यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. रेल्वेसाठी पाचवी सहावी मार्गिका, रेल्वे स्थानकांमध्ये सुविधा, चिखलोली स्टेशन अशी अनेक कामे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कल्याणपर्यंत मेट्रो आली असून लवकरच ती अंबरनाथपर्यंतही येईल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण सुरुवातीपासून सोबत होतो, पण मधली अडीच वर्ष कुणाच्या तरी महत्वाकांक्षेसाठी आपण सोबत नव्हतो, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपला साथ दिली, असे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी सांगितले. आपला देश मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या ५ अर्थव्यवस्थांमध्ये आला असून भविष्यात पहिल्या ३ मध्ये सुद्धा येईल असा विश्वास याप्रसंगी डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी व्यक्त केला. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य वेगाने प्रगती करत असल्याचे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल, मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष याकूब मीरा सय्यद, महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक, शहर अध्यक्ष सर्जेराव माहुरकर, महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर, शिवसेना माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, निखिल वाळेकर यांच्यासह भाजपाचे महिला, पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss