Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Exclusive: Thane लोकसभेतून Naresh Mhaske यांची उमेदवारी निश्चित

सध्याची मोठी बातमी म्हणजे ठाणे लोकसभेसाठी नरेश गणपत म्हस्के यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरु होती. आता ठाणे लोकसभेसाठी नावाबाबतचा तिढा सुटला आहे. ठाणे लोकसभेच्या रिंगणात आता नरेश म्हस्के यांच्या नावाची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी टाईम महाराष्ट्र वेबपोर्टलकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत नरेश म्हस्के व्यक्त झाले होते. ठाण्यातून लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ‘होमपीच’ असलेल्या ठाण्यात जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला मिळणार यावरच बराच खल सुरू होता.

सरतेशेवटी ही जागा शिवसेना लढवणार हे निश्चित झाल्यावर त्यासाठी तीन ते चार प्रबळ दावेदार तयार झाले होते. तर भाजप कडूनही दोन नेत्यांनी इच्छुकता दाखवली होती. आता नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यामुळे सर्वच चर्चांना पूर्णविराम लागला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), विधानपरिषद माजी सदस्य रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांचे नाव पुढे येत आहे. आता, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांचेही नाव पुढे येत आहे. यापैकी उमेदवारीचा टिळा कोणाच्या भाळी लागणार? असा प्रश्न टाईम महाराष्ट्रकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत नरेश म्हस्के यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते की, “आमच्यामध्ये इच्छूक नावाचा काही प्रकार नाहीये. पक्षाचे मुख्य नेते याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील. माझ्या दृष्टीने वैयक्तिक उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही काम करत नसून महायुतीसाठी सर्व एकत्र येऊन काम करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आणि ठाण्यातील जागा सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्याचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. उमेदवारी आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.”

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss