Saturday, July 27, 2024

Latest Posts

Ganpat Gaikwad यांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर चोपडा कोर्ट येथे हजर करण्यात आले होते. यावेळी चोपडा कोर्ट येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वकीलांनी दिली आहे.

एकीकडे भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात चांगलची खळबळ उडाली. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss